गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन २०२५-२६ इ. ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन…शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. यापूर्वी महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांचा ऑनलाईन प्रवेशामध्ये समावेश होता. यानंतर राज्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांसाठी हा नियम लागू करण्यात आला असून आता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये इ. ११ वी ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु झाली आहे. |